सडा पडता उन्हाचा,
वारा उबदार सुटे.
क्षितीजाच्या पोटातून,
गोल तांबडे हे फुटे.
सुरू होई किलबिल,
पिल्ले घरटी उपाशी.
दाणा शोधून आणण्या,
माय झेपावे आकाशी.
पिल्ले एकटी सोडता,
जीव माऊलीचा तुटे.
ओढा कर्तव्याचा भारी,
नभी मायेला ह्या रेटे.
जीव कावराबावरा,
दाही दिशा धुंडाळतो.
दाणा घेउनी फिरता,
पूर मायेचा दाटतो.
जगी अशी माऊली
उत्तर द्याहटवाजिचा मायेचा पदर
तिची आभाळागत माया
अगणित छाया
ती सोसते रे ऊन
द्यावया पिल्लाना छाया
कसे फेडणार हे ऋण
तू स्वतःहुन
खूप छान!👌
हटवा