बुधवार, १ जून, २०२२

लाडिक चांदणे

तार डोळ्यांवर येता,
तोंड वेंगाडून बसे.
माझे लाडिक चांदणे,
तोंड कुशीत खूपसे.

जरा ओंजारून घेई,
गोंजारून घेई केस.
मुटकळून अंगास,
व्यापून टाकशी कुस.

मग स्वैर भटकंती,
स्वप्नी होतसे सुसाट.
वेडे गालात हसते,
कैसी आठवाची लाट.

किती निवांत पहुडे,
माझ्या कुशीतले वेडे.
पिल्लू खुलूनिया दिसे,
स्वप्नी आनंदाचे सडे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

गुंफण तूझी माझी

तुझ्या माझ्या भाकरीतला, चंद्र रोजचाच आहे. निवांत वेळ काढून, कधी नभातील चंद्र बघू. तुझ्या माझ्या कमाईला, खर्च रोजचाच आहे. थोडी ढील देऊन, कधी ...